उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 मानवी जीवनामध्ये शिक्षणाला खुप महत्वाचे स्थान निर्माण झालेले आहे. प्रत्येक विद्याथ्र्याने शिक्षणाची साथ आपल्या जीवनामध्ये घेऊन आपले आपल्या कुटूंबाचे व आपल्यामुळे समाजाला चांगले योगदान देवू शकतो. असे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे यांनी रुईभर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या गुवणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात बोलताना वरील उद्गार काढले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दत्तात्रय कस्पटे होते. यावेळी मेडीकलला संदीप विठ्ठल पवार, प्रदीप विठ्ठल पवार, संकेत सोपान निंबाळकर, रामेश्वर चव्हाण रुईभर येथील सर्वसामान्यांच्या मुलांची निवड मेडीकलला झाल्यामुळे सत्कार करण्यात आला.

श्री कोळगे पुढे बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांनाही जास्तीत जास्त शिक्षण घ्यावे अनेक अडचणीवर मात करावी शिक्षण घेण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. अडचणी आल्या तर समाजातील अनेक लोक मदतीसाठी पुढे येतात अशी खुप उदाहरणे आहेत. यावेळी उपसरपंच बालाजी कोळगे, तलाठी निरंजन गुजर, कृषीसहाय्यक सौ. रंजना मुंडे, रामेश्वर चव्हाण, भगीरथ लोमटे, राजा भनगे, सोपान निंबाळकर, विठ्ठल पवार, राजेंद्र गव्हाणे, अभिजीत माने, राजकुमार लोमटे, नारायण वडवले, धनंजय चव्हाण, शंकर चव्हाण, अशोक सिरसाठे, मुकुंद पाटील, भागवत पाडूळे, अमोल चव्हाण, फुलचंद वडवले, बाबासाहेब कोळगे, शिवाजी वडवले, प्रशांत मते, आप्पा तिर्थकर, शाहु शेरखाने, मधुकर निंबाळकर, गणपत कस्पटे, अमरसिंह कोळगे, अनिकेत कोळगे, या कार्यक्रमात सर्व गुणवंतानी आपले विचार मांडले. यावेळी मोठया संख्येने लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, आभार ग्रामसेवक प्रदीप कुंभार यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 
Top