श्री जगदंबा मंदिर ट्रस्ट व भाजप महिला आघाडी लोहारा तालुका यांच्या वतीने कोविड -19 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा कार्यकर्ती, गतप्रवर्तक, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आदींचा दि. 22 ऑक्टोबर रोजी भाजपाचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करुन सन्मान करण्यात आला.
यावेळी जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, जि.प.अर्थ व बांधकाम सभापती दत्ता देवळकर, जि.प.सदस्या शितल पाटील, नगराध्यक्षा ज्योती मुळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, नेताजी पाटील, अभयराजे चालुक्य पाटील, माधव पवार, राजेंद्र पाटील, वामन डावरे, दिनकरराव जावळे पाटील, नागणा वकील, चंद्रकांत पाटील, विक्रांत संगशेट्टी, आरती गिरी, आयुब अब्दुल शेख, नेताजी शिंदे, दयानंद गिरी, शिवशंकर हत्तरगे, विठ्ठल वचने पाटील, दिपक मुळे, दगडु तिगाडे, प्रमोद पोतदार, शंकर आप्पा मुळे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद गिरी यांनी केले व तसेच सतीश गिरी यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री जगदंबा मंदिर ट्रस्टचे उमाकांत लांडगे, रमेश जाधव, शिवराज झिंगाडे, प्रशांत माळवदकर, सतीश गिरी, गौरव गोसावी, प्रतिक गिरी, पिनू कदम, अंकुश बंडगर, आदींनी परिश्रम घेतले.