तुलजापूर / प्रतिनिधी

जागतिक संसर्गजन्य रोग म्हणुन घोषित केलेल्या कोरोना व्हायरसचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तुळजापूरचे  माझी उपनगराध्यक्ष  कै. धन्यकुमार काका क्षिरसागर यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त युवा सामाजिक कार्यकर्ते दिनेशआण्णा क्षिरसागर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे  दि.  22   रोजी आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटनावेळी  आनंद क्षिरसागर, पंकज पाटील, राजाभाऊ शिंदे , दिपकआण्णा महामुनी , प्रवीण नाडापुडे , दिपक अगरवाल , सज्जन जाधव उपस्थित होते.

 या शिबिरात एकूण 78 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली या शिबिराच्या यशस्वीतेसाठी दिनेशआण्णा क्षीरसागर, संदीप भोसले, अभिजित भोसले, सुरज गायकवाड, अतुल सोमवंशी, किशोर जाधव, अतुल साठे, अमीर बागवान, रोहित दरेकर, संकेत घोगरे यांनी परिश्रम घेतले.  सोलापूर येथील सोलापूर ब्लड बँकेंच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले.

 
Top