उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील तेर ग्रामसेवा संघाने स्वच्छतेसह सामाजिक कार्याचा ध्यास घेतल्याने तेरच्या सुजान नागरीकामध्ये ग्रामसेवा संघांच्या कार्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे सामाजिक बांधीलकी म्हणून सेवाभावीव्रत्ती जोपासण्यासाठी तेर ग्रामसेवा संघाची स्थापना करण्यात आली. यामध्ये डाँक्टर,वकील,पञकार,शिक्षक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक,युवक, बालकासह सहभाग घेऊन दोन वर्षापूर्वी तेर ग्रामसेवा संघाची स्थापना करून दर रविवारी सकाळी तीन तास तेरमधील एक भाग स्वच्छ करण्यास प्रारंभ करण्यात आला.बघता बघता तेर ग्रामसेवा संघाने तेरचा मुख्य रस्ता,संग्रहालय,चैत्यग्रह,ग्रामीण रूग्नालय,तिर्थकुंड,संत गोरोबा काका मंदीर व परीसर व दगडी घाट,ञिविक्रम मंदीर,उत्तरेश्वर मंदीर,बसस्थानक,महाराष्ट्र संत विद्यालयाचा परीसर स्वच्छ केला. तेरकरांना स्वच्छता राखा हा संदेश देण्याचा प्रयत्न केला.तेरमध्ये अनेक नागरीक उघडयावर कचरा टाकीत होते.त्यासाठी तेर ग्रामसेवा संघाने तेरमध्ये 35 कच-या कुंडया विविध ठीकाणी ठेवलेल्या आहेत.2019 ला श्री.संत गोरोबा काका यांच्या वार्षीक याञेनिमीत्त स्वच्छ जारचे पाण्याची पाणपोईव्दारे भाविकभक्तासाठी सोय केली होती.
श्री.लक्ष्मी नरसिंह मंदीर परीसरात तेर ग्रामसेवा संघाने व्रक्षारोपन करून ही झाडे जोपासली आहेत.या सामाजिक कार्याची दखल घेऊन पुणे येथील वृक्षवल्ली परीवाराच्या वतीने “व्रक्षवल्ली “पुरस्कार तेर ग्रामसेवा संघास प्रदान करण्यात आला तसेच रोटरी क्लब,उस्मानाबाद,ग्रामसेवा संघ खेड, तेर येथील संग्रहालयात जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते ग्रामसेवा संघाचा गौरव करण्यात आला.उस्मानाबाद येथील अखिल भारतीय साहित्य संम्मेलनाच्या वेळी जे साहित्यिक,पर्यटक तेरला येतील त्यांना” तेर दर्शन” माहीती देऊन “तेर दर्शन” घडवुन आणले.कोरोनाच्या या काळात 132 गरीब,गरजूना लोकसहभागातून किराणा मालाचे किट वाटप करण्यात आलेले आहे.कोरोना रोगाबाबत घ्यावयाची काळजी याबाबत तेरमध्ये जनजागृती केली. आता लोकसहभागातून “ हरीत तेर “करण्याचा ग्रामसेवा संघाचा मानस असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असून दानशूर व्यक्ती ग्रामसेवा संघाच्या सामाजिक कार्यामुळे ग्रामसेवा संघात धान्य रूपात,अर्थीकही मदत करत आहेत. तेर ग्रामसेवा संघाच्या स्वच्छतेसह सामाजिक कार्यामुळे तेरच्या सुजान नागरीकामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.