राज्यात बार सुरु व मंदीर बंद या महाविकासआघाडी सरकारच्या काळ्या निर्णयाविरुध्द भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, परंडा तालुक्याच्या वतीने यांच्यावतीने दि.१३ ऑक्टोबर २०२० रोजी महाराष्ट्राचे कुलदैवत श्री काळभैरवनाथ मंदीर सोनारी येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करुन नाकर्ते राज्य सरकार विरुध्द घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सुखदेव टोंपे, गणेश खरसडे, महावीर तनपुरे, विठ्ठल तिपाले, रमेश पवार, विलास खोसरे, बिभीषण हांगे, दादासाहेब गुडे, तानाजी पाटील, रमेश काळे, साहेबराव पाडुळे, श्रीकृष्ण शिंदे, महादेव बारस्कर, अशोक भोळे, किरण देशमुख, प्रमोद लिमकर, बाळासाहेब गोडगे, रामकृष्ण घोडके, सागर पाटील, नागेश शिंदे, बापुसाहेब कोळी, अरविंद रगडे, दत्ता ठाकरे, गिरीधर कोलते, राहुल जगताप, ब्रम्हदेव उपासे, पोपट सुरवशे, जोतीराम गिरवले, नागेश गर्जे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.