उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उस्मानाबाद जल्ह्यातील उमरगा येथील लातूर मार्गालगत असलेल्या लक्ष्मी पाटी परिसरातील विट भट्टीवर मजूरी करणाऱ्या पारधी समाजाच्या महिलेवर विट भट्टी चालक व अन्य तिघे अशा चार नराधमानी सदरील महिलेस पळवून नेऊन तिच्यावर आठवडाभर दुष्कर्म केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे परंतु त्याना आणखीन अटक झालेली नाही.त्या आरोपी तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी उस्मानाबाद  जिल्हा भाजपा महिला आघाडी व युवती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात दिवसेंदिवस बलात्कार, हत्या होत आहेत तरी हे राज्यसरकार कुंभकर्णाची झोप घेत आहे. रोज मोकाट हरामखोरा कडून महिला, मुलींच्या आब्रुचे लचके तोडले जात आहेत. यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. उठ द्रोपदी शस्त्र उचल, आता गोविंदा येणार नाही तुझ्या सुरक्षितेसाठी अशी वेळ आलेली आहे तरी सदर नराधमांना लवकरात लवकर अटक करुन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा उस्मानाबाद  जिल्हा भाजपा महिला आघाडी व युवती मोर्चा यांच्याकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर माधुरी गरड, आशा लांडगे, राठोड पुजा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


 
Top