तुळजापूर/ प्रतिनिधी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञउत्सव पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मातेचा  छबिना ज्या अकरा वाहनांवर  काढला जातो त्यांची किरकोळ दुरुस्ती पुर्ण होवून रंगरंगोटी करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे.

श्री तुळजाभवानी मंदीरात वर्षभरात दर पोर्णिम, मंगळवार, शुक्रवार व शारदीय नवराञोत्सव व शाकंबरी नवराञोत्सव कालावधीत राञी मंदीर  प्रागणांत देवीची चांदीची उत्सव मुर्ती विविध वाहनांवर ठेवण्यात येवुन  देविची छबिना काढण्याची परंपरा आहे. हा देविचा छबिना सिंह, वाघ, हत्ती, घोडा, मोर, नंदी, दैत्य, गरुड, पितळी गरुड दोन रथ अशा अकरा  लाकडी बनवलेल्या व भक्तांनी अर्पण केलेल्या छबिना वाहनांवर काढला जातो.

ही वाहने छबिन्यासाठी नक्षञानुसार निवडले जातात या वाहनांची रंगरंगोटी शारदीय नवराञउत्सवापुर्वी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आता  शारदीय नवराञउत्सवात नऊ दिवस या वाहनांवर देविचा छबिना भाविकांविना काढला जाणार आहे.


 
Top