उस्मानाबाद/ प्रतिनिधी

उमरगा येथून निर्धारीत ठीकाणी पोहचविण्यासाठी दोन वाहनातून पाठविण्यात आलेला तब्बल २२ मेट्रीक टन तांदुळ दोन ट्रक चालकांनी संबधित ठिकाणी न पोहचविता गायब गेल्याचे समोर आले आहे. 

याप्रकरणी उमरगा येथे गुन्हा नोंद झाला आहे. यामध्ये उमरगा येथील विजय शेषेराव पवार (रा.हनुमान नगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कलिम काझी (रा. उस्मानाबाद) व मिनीट्रक क्र. एमएच १३ आरबी ७९९७ च्या अज्ञात चालकास २२ मेट्रीक टन तांदुळ उमरगा येथून बाहेर नेण्यासाठी देण्यात आला होता. माल वरील दोघांनी दि. २१ जुलै रोजी दोन वाहनांत भरुन नेला. परंतु, ठरल्या ठिकाणी पोचवला नाही व परतही आणुन दिला नाही त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी व तांदळाचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 
Top