गोविंद पाटील / प्रतिनिधी :-
तालुक्यातील बेंबळी येथे असलेली एकमेव राष्ट्रीयकृत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा आपल्या ढिसाळ कारभारामुळे सतत चर्चेत येत आहे. बेंबळी गाव व्यापारी दृष्टीने मोठे समजले जाते. कोरोनाच्या या कठीण कार्यकाळामध्ये शेतकरी व व्यापारी, नागरिक अनेक आडचणींचा सामना करीत आहेत. अशा या परिस्थितीमध्येच येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गेल्या अनेक दिवसापासून बंद असल्यामुळे शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधीत प्रशासनाने लक्ष घालून योग्य ती कारवाई करून न्याय देण्याची मागणी होत आहे. तसेच या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना ही निवेदन देण्यात आले आहे.
बेंबळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा ही 7-8 गावासाठी दत्तक आहे. ही बँक गेली अनेक दिवसापासून बंद असल्यामुळे बेंबळी व परिसरातील लोकांना आर्थिक नुकसानी सोबत मानिसक त्रास सहन करावा लागत आहे. ही बँक आपल्या आडमुठ्या धोरणामुळे व ग्राहकांना योग्य प्रतिसाद देत नसल्याचे अनेक ग्राहकांमधून तक्रारी केल्या जात आहेत. बँक कंेव्हा सुरू होणार आहे या संदर्भात ग्राहकांनी विचारणा केली असता त्यांना उडवा-उडवीचे उत्तरे देण्यात येत आहेत. ही बँक कोणतीही पुर्व कल्पना न देता बंद केली असल्यामुळे चेक बाउन्स होत आहेत तसेच संबंधित ग्राहक, व्यापारी, नागरिक, व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहेत. अनेक शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे प्रकरण ही प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याकडे संबंधीत प्रशासनाने लक्ष घालून योग्य ती कारवाई करून न्याय देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
राष्ट्रीयीकृत बँक नाही
बेंबळी गाव व्यापारी दृष्टीने मोठे समजले जाते. महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखासह गावात तीन मल्टीस्टेट, तीन पतसंस्था, 2162 महिला व पुरुष बचत गट, या सर्वांची मिळून स्थानिक स्तरावरील सुमारे नऊ हजार खातेदार, परिसरातील 22 गावातील 18 हजार खातेदार यांच्या माध्यमातून बेंबळी गावात दररोज तीन कोटी रुपयांची उलाढाल होते. यामुळे या गावात राष्ट्रीयीकृत बँक उत्तम प्रकारे चालू शकते. बेंबळी ग्रामस्थांनी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यासाठी सातत्याने मागणी केली आहे. परंतु अद्याप याला प्रतिसाद मिळालेला नाही.
जुन्या आकडेवारीचा दाखला
बेंबळी गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यासंदर्भात मागील दोन जिल्हाधिक-यांना मागणी केली
असल्याचे दक्षता फाऊंडेशनचे अॅड. उपेंद्र कटके यांनी सांगितले. तसेच लीड बँक, विविध राष्ट्रीयीकृत बँकेचे शाखा व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केल्यानंतर उलढाल नसल्यामुळे शाखा मंजूर करता येत नसल्याचे सांगण्यात आले. परंतु याचे अवलोकन करत असताना 2011 मध्ये तयार करण्यात आलेल्या सेन्सेक्स नुसार लोकसंख्या, आर्थिक व्यवहार, उलाढाल याची आकडेवारी पाहिली आहे, यामुळे शाखा मंजूर करण्यास विविध घटकांनी नकार दिल्याचे कटके यांनी सांगितले. सद्यस्थितीत दक्षता फाउंडेशनच्या माध्यमातून बेंबळी व परिसरातील खातेदार, शेतकरी, व्यवसाय, उलाढाल, यूपीए आयडी वापरणाऱ्यांची संख्या, जीएसटी क्रमांक धारक व्यापारी यांचे अधिकृत संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करून बँकेची शाखा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले. यासाठी बेंबळी व परिसरातील २२ गावांतील सरपंच तथा अन्य लोकप्रतिनिधीशी संपर्क साधून त्यांच्याकडून ग्रामपंचायतचे व ग्रामसभेचे ठराव घेऊन शाखा सुरू करण्यासंदर्भात दक्षता फाउंडेशन प्रयत्न करत असल्याचे अध्यक्ष गालिब पठाण यांनी म्हटले.
यामुळे नाही प्रस्ताव
बेंबळी गावातील बहुतांश लहान मोठे व्यापारी व व्यवसायिकांनी व्यवसाय सुरू करत असताना व्यवसायिक विज कनेक्शन घेतलेले नाही. घरगुती प्रकारचे कनेक्शन घेऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. यापूर्वीच्या लीड बँक मॅनेजर यांनी पूर्वी यासंदर्भात संख्या व अहवाल महावितरण कडे अॅड. उपेंद्र कटके यांच्या माध्यमातून मागवला होता. तेव्हा बेंबळी गावातील तब्बल 80 टक्के व्यापाऱ्यांनी विज जोडणी घेत असताना घरगुती कनेक्शन दाखवले. यामुळे गावात व्यापार व व्यवसाय नसल्याचा निष्कर्ष काढून राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. आता यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. महावितरणकडे अशा वीज ग्राहकांना शोधून त्यांना व्यावसायिक कनेक्शन घेण्यासंदर्भात भाग पाडण्यासंदर्भात मागणी करण्यात येणार आहे. यासाठी व्यापाऱ्यांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बेंबळी ता जि उस्मानाबाद या बँकेचा चालू खातेदार आहे. मी व्यवसायाने
मेडिकल दुकानदार आहे. आज ११ दिवस झाले बँक पुर्णतः बंद आहे. कधी चालू होईल विचारण्यास गेल्यावर कोणीच प्रतिसाद देत नाही. माहीत नाही म्हणून धकलावणी केली जातीय. त्यामुळे माझ्यासारख्या व्यापारी वर्गाचे खूप नुकसान होत आहेत. कोणतीही पूर्व कल्पना न देता बँक बंद केल्यामुळे अगोदर सोडलेले चेक बाउन्स होत आहे. चेक बाउन्स मुळे आर्थिक दंड ला सामोरे जात आहोत.

भास्कर प्रभाकर बोंदर, रा. बेंबळी ता. जि. उस्मानाबाद