उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

महाराष्ट्रातील शेतकरी पुर्वी कोरोना प्रादुर्भावामुळे व वर्तमानात या अस्मानी संकटामुळे अर्थात अतिवृष्टिमुळे पुर्णत: उध्वस्त झाला आहे. राज्यकर्ते या संकटावर मात करत तात्काळ शेतकऱ्यांना सहकार्य करण्यापेक्षा उध्वस्त शेती व शेतकन्यांना भेटण्यासाठीचे नाटक करत महाराष्ट्रभर फिरत आहेत. हि दिखावे नाटके बंद झाली पाहिजेत. शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या राज्यकर्त्यांना महाराष्ट्र सहन करणार नाही. लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्रामध्ये राज्यकारभार करण्याच्या वल्गना करणारे हे सरकार शेती व शेतकऱ्यांप्रती संवेदनाहीन होऊन दुटप्पी भाषा कशासाठी वापरतात हा खरा प्रश्न आहे.शेतकऱ्यांना तात्काळ मदत करुन त्यांचे अश्रु पुसण्यापेक्षा केवळ नाटकी पनात राज्यकर्ते मशगुल आहेत, असा आरोप संभाजी  बिग्रेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅड. मनाेज आखरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे. 

अॅड. आखरे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकार या संवेदनाशिल अडचणीत राजकिय कपटकारण करत असेल तर आजचा हा तरुण शेतकरी अश्या कपटकारन्यांना बांधावरच गाढल्या शिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्रतातील बहुसंख्य आमदार, खासदार व मंत्री हे शेतकरी पुत्रच आहेत परंतु संवेदनशुन्य आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना भेटीचे नाटक करण्यापेक्षा शासकीय मदत व पिक विमा निधी कसा तात्काळ उपलब्ध करुन देता येईल ते बघीतले पाहीजे.शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी पाहणी करुन तात्काळ अहवाल देण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आहेत. शासनाचा शेवटचा बोल्ट म्हणजे गावचा पटवारी (तलाठी) आहे. त्यांच्या नजर अंदाजाने ४८ तासात १००% उध्वस्त जमीनीचा अहवाल शासनाकडे दिला पाहिजे परंतु तसे होतांना दिसत नाही. केवळ पंचनाम्याचे नाटक करुन चालढकल करण्याच काम हे सरकार करतेय. केंद्रसरकारच्या २०१८ च्या तरतुदी नुसार शेतीच एकंदरीत ३५% नुकसान झाल तरी ते नुकसान ग्राहय धरुन तात्काळ मदत द्यावी असा निर्णय आहे. आज रोजी तर १००% नुकसान झाले, शेतातील पिक - मातीसकट वाहुन गेली आहेत. सर्वकाही भुईसपाट झालेले आहे. तरी ही पंचनाम्याची नाटके कशासाठी? शेतकऱ्यांना बिना पंचनामा तात्काळ हेक्टरी ५०,०००/- (रु. पन्नास हजार केवळ) मदत शासनाने करत पिक विमा संरक्षणाचा निधी सुध्दा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला पाहिजे. केवळ नाटक करुन, दिखावे करुन शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ नका महराष्ट्र हे कधीच सहन करणार नाही. शासनाने शेतकन्यांना तात्काळ सहकान्यांची पाऊले उचलली नाहीत तर संभाजी ब्रिगेड राज्यभर तिव्र आंदोलन करणार, राज्यकाऱ्यांना अडवणार व जाब विचारणार असा इशाराच त्यांनी दिला.

 
Top