अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांची पहाणी केली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्यांची जनावरे दगावली अशा लोकांना प्रतिनिधिक स्वरूपात मदतीच्या चेकचे वाटप केले आहे. येत कांही दिवसात दसरा व दिवाळी आहे. सणासुदीच्या दिवसात लोकांच्या डोळ्यात पाणी येऊ नये. म्हणून मदतीची लवकरच घोषणा करू, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुळजापूर येथील पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री यशवंत गडाख यांनी बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी तुळजापूर तालुक्यातील काटगांव, कात्री, आपसिंगा या गावांची पहाणी केली. त्यानंतर दुपारी ३ वाजता त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
यावेळी बोलताना ठाकरे पुढे म्हणाले की संकट मोठे आहे संकट काळात मी अधिकारी वर्गाच्या संपर्कात होतो त्यांना जिवीत हानी होवू नये यासाठी जे करायाचे ते करा असे मी सांगितले होते.यात वीज पडून सर्वाधिक लोक मयत झाल्याचे स्पष्ट केले मी पाहणी साठी नाही आलो तर दिलासा देण्यासाठी मदत कशी किती करायाची याचे अवलोकन करण्यासाठी आलो असे यावेळी म्हणाले मदत कितीकरायाची यावार काम सुरु आहे ऐंशी ते नव्वद ठक्के नुकसान पंचनामे झाले आहेत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी कर्ज काडायाचे किआणखी काही करायाचे ते पाहू पण मदत लवकरच देणार असल्याचे यावेळी तेलगंणा सरकारने तातडीने मदत दिल्याचा प्रश्नावर,बोलताना ठाकरे म्हणाले कि जीएसटी चे आमचे हक्काचे पैसे आमच्या खिशात असती तर लगेच आम्ही शेतकऱ्यांना मदत दिली असती मदतीचा घास लवकरच शेतकऱ्यांना भरवली जाईल व मदत सरसकट की निकष लावून देणार या बाबतीत भाष्य करण्याचे टाळले. पिकविमा कंपन्या बाबातीत ही प्रश्न आहे त्याबाबत लवकर निर्णय घेणार असल्याचे यावेळी म्हणाले.देशात कोविड चे सर्वाधिक मोटे संकट महाराष्ट्रावर आले होते ते अजुन टळले नाही पण त्याचा समर्थ पणे आपण मुकाबला केला आहे. आपण या संकटाकडे चिल्लर प्रमाणे बघतोय असा आरोप विरोधी पक्षाकडुन होतोय यावर उत्तर देताना ते म्हणाले कि विरोधी पक्षाच्या असल्या चिल्लरपणा कडे आपणास बघण्यास वेळ नाही
खडसे प्रवेशाबाबतीत बोलताना ठाकरे म्हणाले की, ते आमचे जुने सहकारी मिञ आहेत ते लढवये आहेत ते आमच्या परिवारात येत असतील तर आम्ही त्याचे स्वागतच करतो व आणखी कुणी आमच्या परिवारात येत असेल तर त्याचेही आम्ही स्वागत करु असे स्पष्ट करुन भाजपचे नाव न घेता ते म्हणाले की, आमचे जुने मिञ शिखरावर जात आहेत पण पायाचे दगड का निखळतात हे पाहणे गरजेचे आहे व जुन्या मिञाला सावध करणे हे आमचे काम आहे, असे यावेळी म्हणाले
राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करु असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मंत्रीमंडळ बैठक घेऊन मदतीचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. “महाराष्ट्र मला नवीन नाही. यापूर्वी जेव्हा आलो तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो. तुमच्या वेदना, व्यथांना आवाज देण्याचं काम मी तेव्हा करत होतो. माझं कर्तृत्व शून्य आहे, पण तुमच्या आशिर्वादामुळे मुख्यमंत्री झालो आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं. पुढे ते म्हणाले की, “आजची परिस्थिती भयानक आहे. आपण संकटाता सामना केला नाही असं काही नाही. वर्षाची सुरुवातच जागतिक संकटाने झाली आहे. बाहेर पडू म्हणताच निसर्ग वादळ आलं आणि जाता जाता पावसाने तडाखा दिला”.
“आम्ही परिस्थितीचा अंदाज घेत आहोत. अतिवृष्टी होण्याच धोका कमी झाला आहे. पण पुढील सात ते आठ दिवस वातावरण बिघडू शकतं असं हवामान विभागाने सांगितलं आहे. सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणाऱ्यातला मी नाही. जे बोलतो ते मी करतो, पण करू शकत नाही असं बोलत नाही. तुम्ही सर्वजण मला ओळखता. तुम्हाला बरं वाटावं, टाळ्या वाजवाव्यात यासाठी आकडा जाहीर करणार नाही. मी दिलासा देण्यासाठी आलो आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.
यावेळी सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर,खा. ओमराजे निंबाळकर, अामदार कैलास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष अनिल खोचरे सह शिवसेना पदाधिकारी उपस्थितीत होते.