उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दसऱ्याच्या शुभ मुहर्तावर नविन वाहनांची मोठया प्रमाणात विक्री होत असते त्यामुळे अशा नविन वाहनांची नोंदणी होऊन वाहनमालकास वाहनाचा ताबा मिळावा या करिता दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वाहन नोंदणीचे कामकाज सुरु ठेवण्याचे मा. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुटीच्या दिवशी चालू राहिल अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिली. 

 उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांनी, दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयात नवीन वाहन नोंदणी व कर वसुलीचे कामकाज सुरु राहील,यांची नोंद घ्यावी, असे आवाहन  गजानन नेरपगार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे

 
Top