उमरगा/ प्रतिनिधी

वीटभट्टीवर कामावर असलेल्या ३० वर्षीय पारधी समाजातील महिलेचे अपहरण करून नेऊन तिच्यावर आठवडाभर अत्याचार करणाऱ्या वीटभट्टीचालकासह त्याच्या अन्य तीन साथीदारांवर उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

कर्नाटकातील बसवकल्याण तालुक्यातील एका गावातील पारधी समाजातील कुटुंब उमरगा ते लातूर मार्गावरील लक्ष्मीपाटी परिसरातील वीटभट्टीवर काम करत होते. दि. १९ सप्टेंबरला वीटभट्टी मालक सलीम शानेदिवाण याने महिलेला घरातून बाहेर आणत बळजबरीने लातूर मार्गाकडे घेऊन गेला. त्यानंतर आठवडाभर तिच्यावर अत्याचार करून दि.२६ सप्टेंबरला पीडितेला आदम, पतराज अाणि शहारूखच्या ताब्यात दिले. या तिघांनी पीडित महिलेला कळंब पोलिस ठाण्याजवळ नेऊन सोडले. कळंब पोलिसांनी पीडित महिलेच्या आई-वडिलांना बोलावून तिची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने त्यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पीडित महिलेने उमरगा पोलिस ठाण्यात सोमवारी तक्रार दिली.

 
Top