तुळजापूर  / प्रतिनिधी  

हिंदुराष्ट्र सेना तुळजापूरच्या वतीने,छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे शनिवार दि. 31 रोजी  सकाळी 11.00 वाजता. पुलवामा येथे भारतीय वीर जवान यांच्यावर झालेल्या हल्ला हा पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने कट रचून केल्याची माहिती  पाकिस्तानच्या संसदेतील सदस्याने स्पष्ट केली. याच्या निषेधार्थ हिंदुराष्ट्र सेनेच्या संतप्त देशभक्तांच्या वतीने पाकिस्तान चा पंतप्रधान इम्रान खान याचा फोटोला पायदळी तुडवून व पाकिस्तान तसेच इम्रान खान याचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी ओंकार पवार, कृष्णा काळे,युवराज शिंदे,विजय भोसले,रतन व्यव्हारे,विकास सुरवसे, सौरभ कदम,योगीराज जाधव,अविनाश भांगे,कुणाल मोरे, रुपेश शिंदे,राहुल शिंदे,अभिजित देशमुख, परीक्षित साळुंके व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top