तुळजापूर / प्रतिनिधी
हैद्राबाद व तुळजापूरच्या प्रवाशांच्या सोयीसाठी तुळजापूर आगारातून रोज तुळजापूर ते हैद्राबाद ही नविन बस सेवा गुरुवार दि. 22पासुन सुरु करण्यात आली. यावेळी या बसचे पूजन करून चालक व वाहक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल ताई वडणे, सुधीर कदम,शाम पवार,बाळासाहेब शिंदे, सुनिल जाधव,संजय भोसले, लखन परमेश्वर, प्रतिक रोचकरी,सागर इंगळे,चेतन बंडगर, आगारप्रमुख राजकुमार दिवटे,स्थानक प्रमुख बी.एस.राठोड,चालक एन.बी.दिडोळे,वाहक के.ए.हंगरगेकर,आर.आर.जगताप, एस.व्ही.सुरवसे आदींची उपस्थिती होती.