परंडा/ प्रतिनिधी -
मराठा सेवा संघाची नूतन कार्यकारीणी सोमवार सेवा संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवडण्यात आली. यामध्ये तालुका अध्यक्षपदी गोरख मोरजकर, कार्याध्यक्षपदी शाहीर शरद नवले, उपाध्यक्षपदी विशाल पवार व दिनेश गोडगे यांची निवड करण्यात आली.
यावेळी नुतन पदाधिकारी व माजी तालुकाध्यक्ष शशिकांत जाधव यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी वस्ताद नवनाथ जगताप, काकासाहेब साळुंके, प्रा.गोविंद जाधव, देवानंद टकले, अंगद धुमाळ, संजय काशीद, गणेश राशनकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळगे, रवि मोरे, मलिक सय्यद,ता.अध्यक्ष राजकुमार देशमुख,कार्याध्यक्ष समाधान खुळे, दयावान पाटील, पंकज नांगरे आदि उपस्थित होते.