भारतीय जनता पार्टी किसान मार्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे माजी कृषी मंत्री डाँ.अनिल बोंडे हे उदया बुधवारी (दि.14) रोजी धाराशिव जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.
डॉ.अनिल बोंडे यांचे दि.14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता पारगाव ता. वाशी येथे आगमन होणार असून पारगाव येथे ट्रॅक्टरचे पुजन करुन महाराष्ट्रात कृषी सुधारणा विधेयक 2020 लागु करा म्हणून शेतकरी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार आहेत. तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कृषी विधेयक लागु केल्यामुळे त्यांचे अभिनंदनाचे पत्र व शेवटी उपस्थित शेतकऱ्यांबरोबर संवाद साधणार आहेत. गुरुवारी दि.15 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद येथे सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद, 12 वाजता उस्मानाबाद बाजार समितीत आत्मनिर्भर भारत व कृषी विषयक 2020 संदर्भात चर्चा सत्राचे आयोजन यावेळी मा. श्री बोंडे शेतकरी, व्यापारी, कृषीमाल प्रक्रिया उद्योजक सर्वांबरोबर संवाद साधणार आहेत.
यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे, किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे सचिव रंगनाथ सोळंके, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे विधी सेलचे सहसंयोजक अॅड. मिलींद पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुध्दीजिवी प्रकोष्टचे दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य संताजी चालुक्य, अॅड. खंडेराव चौरे, सुधीर पाटील, अॅड.अनिल काळे, अविनाश कोळी,अॅड. व्यंकट गुंड, सतिश दंडनाईक, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे, किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य नानासाहेब यादव, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व कार्यक्रमाला जास्तीत जास्त शेतकरी, कार्यकर्ते, व्यापारी, कृषी प्रक्रीया संदर्भातील उद्योजक, शेती तज्ञ, पक्षाचे पदाधिकारी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे यांनी केले आहे.