तुळजापूर / प्रतिनिधी - 

मंदीरात कोरोना दिसतो बार मध्ये कोरोना दिसत नाही का? मदिरा आणि मंदीरा मधील फरक महाविकास अघाडी सरकारला दिसत नाही असा सवाल करीत भाजपा वतीने मंगळवार दि13 रोजी सकाळी ११ वा  मंदीर भक्तांनसाठी खुले करण्याच्या मागणीसाठी राजेशहाजी महाद्वारा समोर लाक्षणिक उपोषण  करण्यात आले. या लाक्षणिक उपोषणात किरकोळ विक्रेत्या महिला, व्यापारी, पुजारी बांधवानसह भाजपा पदाधिकारी सहभागी झाले होते. यात भाविक व  बांगड्या विक्रेत्या मुस्लीम महिला ही सहभागी झाल्या होत्या . यावेळी उपोषणात सहभागी महिलांनी

“मंदीर बंद उघडले बार,

उध्दवा धुंद तुझे सरकार !

तिघाडी सरकारचे कारायचे काय ,

खाली मुडके वार पाय !!

. “तुझाच आम्हा आधार उघड अंबे दार उघड  “ अशा घोषणा यावेळी उपोषण कर्त्या महिलांनी दिल्या.

यावेळी बोलताना महिला मोर्चा अध्यक्षा उमाताई खापरे म्हणाल्या  मंदीरांन बाबतीत लोकांची विशेषता महिला वर्गाची भावना श्रध्दा आहे.या मंदीरांनवर हजारो कुंटुंबाचा उदारनिर्वाह चालतो तो सहा महिन्या पासुन बंद आहे.  दारु विक्री बार हाँटेल सुरु मग  महाराष्ट्रातील फक्त मंदीरच बंद का ? असा सवाल करीत तिर्थक्षेञ तुळजापूरचे अर्थकरण मंदिरावर अवलंबून  असल्याने पुजारी व्यापारी किरकोळ विक्रेते कुंटुंबांना गेली सहा महिन्या पासुन बंद उपासमारीस सामोरे जावे लागत असल्याने श्रीतुळजाभवानी मंदीर भक्तांनसाठी खुले करावे व चर्च , मशीदी ही खुल्या कराव्यात अशी मागणी यावेळी केली.

यावेळी बोलताना अर्चनाताई पाटील म्हणाल्या कि स्ञीशक्ती श्रीतुळजाभवानीचा  नवराञोत्सव महिलांच्या धार्मिक भावनेशी निगडीत असुन अनवाणी पायाने महिला देवीदारी येतात. मंदीर अद्यापपर्यत न उघडल्याने हे सरकार धार्मिक भावना न जपणारे सरकार असल्याचे यावेळी आरोप केला. जय भवानी जय शिवाजी म्हणून सत्तेवर आलेल्या या सरकारला खुद्द भवानीचाच विसर पडल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. नवराञोत्सव देवीदर्शन न घडणे हे राज्यातील देविभक्तांचा दृष्टीने दुर्दैवी खेदाची बाब असल्याचे सांगुन  मंदीर आम्हा भक्तांनसाठी खुले करण्याचे आवाहन  केले.

 यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ताभाऊ कुलकर्णी , अॅड सतिश दंडनाईक , अर्चनाताई विनोद गंगणे, जिल्हाध्यक्ष क्रांती थिटे , माजी नगराध्यक्षा तथा तालुकाध्यक्ष संगिताताई कदम, नगसेविका भारतीताई गवळी, मिनाताई सोमाजी, अँड अंजली साबळे, शैलजा मुळुक, महानंदा पैलवान , स्वाती जाधव,   माजी नगराध्यक्ष बापुसाहेब कणे,इ विशाल रोचकरी, नागेश नाईक, विनोद गंगणे, नारायण नन्नवरे , गुलचंद व्यवहारे,विशाल छञे, माऊली भोसले, विकास मलबा, दिनेश बागल, सचिन रसाळ, आनंद कंदले, सुहास सांळुके, प्रसाद पानपुडे, शिवाजी बोदले , इंद्रजित सांळुके, विजय माने ,कुमार टोले, बाळासाहेब शामराज, उमेश गवते , शांताराम पेंदे, बाळासाहेब भोसले , शहाजी भांजी, गिरीष देवळालकर संजय खुरुद  आदीं सोबत महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

 
Top