उमरगा / प्रतिनिधी 

कोरोना महlमारीच्या जागतिक संकटामुळे राज्यात सर्वत्र 16 मार्च पासून शाळा बंद आहेत.

मुलांचा कायम कलकलाट असणाऱ्या शाळा मुलांविना सुन्या झाल्या आहेत.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सरकार, शिक्षण विभाग, शिक्षक प्रयत्न करत आहेत. online अभ्यासक्रम, प्रत्यक्ष गृहभेटी,स्वाध्याय पुस्तिका तयार करून वाटप करणे असे अनेक उपाय केले जात आहेत.

ग्रामीण भागात जिथं दोन वेळच्या पोटापाण्याची व्यवस्था अगदी मुश्किलीने होते तिथं जवळपास 10 हजारांचा मोबाईल अशक्य गोष्ट आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरेगाव येथे 55 विद्यार्थी शिकत आहेत. अगदी मोजक्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध आहेत.पालकांकडे जरी मोबाइल असला तरी तो मुलांना लवकर मिळत नाही. आणि पालक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन देऊ शकत नाहीत.अश्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण स्वामी यांनी सरपंच संजय पाटील उपसरपंच विश्वजित खटकेशाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष सौ सारिकाताई वाघमोडे, उपाध्यक्ष भगवान कांबळे व पालक यांच्याशी चर्चा करून गृहभेटीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे व अभ्यास द्यावा असं ठरवलं आणि त्यानुसार सप्टेंबर महिन्यापासून स्वामी प्रवीण,अशोक बिराजदार,लक्ष्मी वाघमारे,उमाचंद्र सूर्यवंशी यांनी गृहभेटीच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना अभ्यासक्रम, स्वाध्यायपुस्तिका सोडविणे इत्यादीबाबत मार्गदर्शन करत आहेत. स्वतः शिक्षक मास्क,सॅनिटायझर याचा वापर करून विद्यार्थी पालक याना देखील समुपदेशन करत आहेत.

 
Top