तुळजापूर / प्रतिनिधी  

 तुळजापूर येथे दि.९ ऑक्टोबर रोजी आयोजीत मराठा आरक्षण मोर्चात सुमारे अडीच हजार लोकांची गर्दी जमली होती. गर्दीतील अनेकांनी मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे अशा स्वरुपाचे निष्काळजीपणाचे कृत्य करून कोविड- १९ प्रसाराची शक्यता निर्माण केली. यावरून गर्दी जमविणारे आयोजक सज्जन साळुंके, जीवन इंगळे, अर्जुन साळुंके, महेश डोंगरे, धैर्यशील पाटील, सुनील नागणेे, अजय साळुंके (रा. तुळजापूर) यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- १८८, २६९, २७० आणि म.पो.का. कलम- १३५ अन्वये गुन्हा तुळजापूर पोलिस ठाण्यात पोलिस प्रशासनाने गुन्हा नोंदवला आहे.


 
Top