सेंद्रीय शेतीच शेतक-यांना फायदेशीर आहे] असे प्रतिपादन राष्ट्रीय सर्वांगीन ग्रामीण विकास संस्था पुणे अंतर्गत मराठवाडा विकास प्रकल्प समन्वयक जयंत पाटील यानी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
सेंद्रीय शेतीमुळे जमिनिचा नैसर्गिकरित्या पोत सुधारतो, उत्पन्न वाढते, खर्च कमी होतो , विषमुक्त अन्न मिळते ज्यामुळे धोके टळतात,आजारपण कमी येते. मालाला भाव चांगला भेटतो,पाण्याची ५० % बचत होते, .सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमिनीत झपाटयाने वाढ होते ,जमिनीची सुपीकता वाढते ,जमिनीचा पोत सुधारतो़,हवेतील ओलावा ओढून घेते,नत्र उपलब्ध होते . प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा वेग वाढतो,सजिवता वाढते ,पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते,जमिनीत संजिवकांची निर्मिती होते ,जमिनीत नविन घडण होते ,पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात,स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो,आंतरकाष्टांगजन्य विघटन,मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते.
सर्वच रासायनिक क्रिया -प्रक्रियांचे नियंत्रण होते , जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते,कर्ब- नत्र गुणोत्तर कमीत कमी होते, एकदल-द्विदल आंतरपिकांचे आच्छादन मायेचा पदर असतो ,जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात , मातीची धूप थांबून पाणी जिरते,आच्छादनाने देशी गांडूळे चमत्कार करतात,जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, आंतरपिकांची मुळे कुजवून जमिनीस पहेलवान बनवण्याचे कार्य करते,जमिनीत मुबलक सुर्यशक्ति साठविली जाते,पिकाचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो, पिकांत साखरेचे प्रमाण, उत्पादन वाढवते,पिक -प्रती- पिक उत्पादन वाढतच राहते,बियाणांची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते ,उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवून जगवते, जिवाणू संख्या वाढतच राहते प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो, जलधारणाशक्ती वाढते,जमिनीचा सामू नियंत्रित होतो, खारे पाणी सुसह्य होते,
फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात, जमिनीतील व हवेतील उष्णता ह्यांचे मधील परस्पर अदलाबदली रोखली जाते, जमिनीला अतिनील किरणांपासून वाचविते, जमिनीत शक्ती संतुलन बनते, जमिनीत जैवगतीशास्त्राला चालना मिळते, वैश्विक किरणांना पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते,पिकांची व फळांची चव तर वाढतेच शिवाय टिकाऊपणा पण वाढतो , हवेतील आर्द्रता वेळप्रसंगी मुळयांना व जिवाणूंना पुरवली जाते ,जमिन क्षारपड होण्यापासुन वाचते,जमिनीवरिल वातावरण खेळते राहते, जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक नियंत्रित होतो, जमिनीचे शुद्धिकरण होऊन पिकांत प्रतिकारशक्ति निर्माण होते , जमिनीत गुरुत्वाकर्षण व केशाकर्षण शक्तींचे संतुलन साधले जाते ,सर्वात महत्वाचे म्हणजे जमिन पूर्वरत स्थितीत राहते असे प्रतिपादन राष्ट्रीय सर्वांगीन ग्रामीण विकास संस्था पुणे अंतर्गत मराठवाडा विकास प्रकल्प समन्वयक जयंत पाटील यानी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.