कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सर्व मंदिरे बंद केलेली आहेत. आता हळूहळू सर्व व्यवहार, बाजारपेठ व जनजीवन पूर्वपदावर येत असताना सरकारने मंदिरावरील बंदी मात्र अजून उठवलेली नाही. याबाबत जनतेत आक्रोश वाढत आहे.
याच जनभावनेचा विचार करून विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने उस्मानाबादेत धारासूर मर्दिनी मंिदरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भविकांच्या भावनेचा जास्त अंत न पाहता लवकरात लवकर मंदिरे खुली करावी अशी मागणी करण्यात आली. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी विहिंप जिल्हामंत्री श्रीकृष्ण धर्माधिकारी, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अॅड. विक्रम साळुंके, विहिंप जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चवरे, दत्ता माकोडे, बाबुराव महाराज पुजारी, प्रभावती मार्डीकर, अर्जुन साळुंके, बालाजी चव्हाण, महेश कुंभार, राहुल पाटील, नितीन जट्टे, आलोक शिंदे, कृष्णा जितकर, विकास वाघमारे आदींनी पुढाकार घेतला.