उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 64 व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सम्राट अशोक विजयादशमी दिनानिमित्त महामानव बोधीसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बावीस प्रतिज्ञाचे सामुदायिक वाचन करून बुद्ध वंदना घेऊन महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समिती सहित इतर पक्ष पार्टि संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

अभिवादन करतांना आर पि आय (आ) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ,हर्षवर्धन बनसोडे,बौध्द महासभेच्या शिलाताई चंदनशिवे,अस्मिता पालवे,रंजना लोखंडे,गणेश रानबा वाघमारे,जीवा संघटनेचे नामदेव वाघमारे,राजेंद्र धावारेसर,बाबासाहेब बनसोडे, धनंजय वाघमारे,संजय गजधने,राजरत्न शिंगाडे, सोमनाथ जानराव,अनिल उबाळे,स्वराज जानराव,रमेश कांबळे,विनायक गायकवाड,सोमनाथ गायकवाड,उदयराज बनसोडे,सिद्राम वाघमारे,संतोष ओव्हाळ,कुमार गायकवाड, मुकेश मोटे,अनिल बनसोडे सहित अन्य इतर समाज बांधव उपस्थित होते.


 
Top