उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 पावसाच्या  कोसळत्या सरीत  महिलांना हक्काच्या नोकरीवरून काढून टाकून त्यांना नाऊमेद करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दि. १२ ऑक्टोबर रोजी उस्मानाबादेत महिलांनी प्रचंड मोर्चा काढाला. 

उमेद योजना महाराष्ट्र शासन राबवत होती. परंतू आता खाजगी ठेकेदाराच्या हाती देऊन त्याच्या माध्यमातून त्यांना नियुक्ती देण्याचा सरकारने घेतलेला निर्णयामुळे बचत गटातील महिलांनी   शासनाने काढलेल्या  ‘त्या’ परिपत्रकाला  कडाडून विरोध केला.  या मोर्चाचे नेतृत्व जिपच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील व विद्यमान अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांनी केले. महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने अभियानाला जोडलेल्या ५० लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी  खडतर झाला आहे. शासनाकडून मिळणारा निधी ठप्प झाला असून संस्था मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली आहे. महिलांच्या संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरू राहावे व बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये या मागणीसाठी 

 उमेद अभियानाचे जवळपास ५ लाख बचत गट, ग्रामसंघ व प्रभाग संघ,राज्य भर उभे झाले आहेत. यात ५० लाखापेक्षा जास्त महिला राज्यभरात जोडल्या गेल्या आहेत. या महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी आणि त्यातून त्यांना शाश्वत उपजीविका निर्माण करून देण्यासाठी अभियानाने समर्पित कर्मचारी व अधिकारी भरती केली. समुदाय संसाधन व्यक्ती,  बँक सखी, आर्थिक साक्षरता सखी ,कृषी सखी, पशु सखी ,ग्रामसंघ लिपीका, कृती संगम सखी यासारखे अनेक कॅडर ग्रामीण कुटुंबाचे शाश्वत उपजिविकेसाठी विविध उपक्रमाचे माध्यमातून कार्यरत होते.

हा मोर्चा लेडीज क्लब येथून भरपावसात शहर पोलिस ठाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे  दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.    या मोर्चातुन गट, ग्रामसंघ व प्रभाग संघांना दिला जाणारा निधी वितरित करावा, बाह्यसंस्थेचा हस्तक्षेप थांबवावा, कॅडेरचे थकीत मानधन त्वरित वितरीत करावे, ज्या समूहांना खेळते भांडवल मिळालेले नाही त्यांना निधी द्यावा, अभियानातील कर्मचाऱ्यांची सेवा अविरत सुरू ठेवल्यास महिलांच्या संस्था आणखी बळकट होतील या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

 
Top