उस्मानाबाद/ प्रतिनिधी

केंद्र शासनाने सेवायोजना कार्यालय ( सक्तीने पदे अधिसुचित  करण्यांस भाग पाडणे ) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 (The Employment Exchanges) Compulsory NOTIFICATION Of Vacancoes Cat,1959 And the Rules 1960 made there under पारित केली असून या कायद्याच्या कलम 5 अनसर्व संबंधित उद्योजकांनी त्यांच्याकडील  मनुष्यबळ माहिती दर तिमाहिस ऑनलाईन भरुन या कार्यालयास सादर करणे बंधणकारक आहे.

कायद्यातील नियम -6 च्या पोटनियम -3 मध्ये निर्गमित करण्यांत आलेले आहे. की तिमाही विहीत प्रपत्र ई आर -1 च्या प्रयोजनार्थ प्रत्येक वर्षाच्या 31 मार्च, 30 जून ,30सप्टेंबर व 31 डिसेंबर या विहीत तारखा असतील व विहीत प्रपत्र या विहीत तारखेपासून एकमहिन्याच्या आत सादर करणे अनिवार्य आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्हयातील सर्व आस्थापनानी दि.30 सप्टेंबर 2020 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई आर-1 दि.31 ऑक्टोबर-2020 पर्यंत भरण्यात यावे

या तिमाही विवरपत्र उद्योजकांना / आस्थापनांना ऑनलाईन सादर करता यावे. यासाठी विभागामार्फत हे वेबपार्टल विकसीत करण्यात आले असून सदरील वेबपोर्टलद्वारे आपण दि. 30 सप्टेंबर 2020 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई आर -1 दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत आपला युजर आयडी व पासपोर्ट वापरुन ऑनलाईन पघ्दतीने भरावे. असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र .उस्मानाबाद यांनी केले आहे.

 
Top