उस्मानाबाद / प्रतिनिधी-

एक दिशा’ ‘एक भाषा - एक धोरण’ तेच ‘तोरण” मराठ्यांचा “एकसूत्री” कार्यक्रम, राज्याची “सिंहावलोकन” बैठक ही दिनांक 07 - ऑक्टोबर  रोजी दुपारी 02:00 ते - सायंकाळी 06:00 दरम्यान समर्थ मंगल कार्यालय, उस्मानाबाद येथे पार पडली. मराठा आरक्षण आंदोलनाची राज्याची एकसूत्री भूमिका १७ ऑक्टरोबला पुण्यातून ठरवली जाणार आहे. 

 या बैठकीला अखिल भारतीय छावा चे अध्यक्ष नानासाहेब जावळे, मराठा महासंग्राम संस्थापक राजकुमार सूर्यवंशी, स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक डॉ कृषीराज टकले, मराठा आरक्षण विषयाचे अभ्यासक कायदेतज्ञ अॅड. राजेश टेकाळे, अॅड. आशिष गायकवाड, अॅड. रमेश दुबे  तसेच या बैठकीला मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी न्यायमुर्ती  बी जी कोळसे पाटील काही कारणास्तव येऊ शकले नाहीत परंतु त्यांनि फोन कॉल वरून माईक स्पीकर वरून फोनवर बैठकीला संबोधित केले, मराठा सेवा संघाचे माजी प्रदेश अध्यक्ष नेताजी गोरे, शिवधर्म फौंडेशन संस्थापक दीपक काटे, स्वराज्य सेनेचे संस्थापक संजय वाडकर, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे, मराठा उद्योजक परिषदेचे भागचंद झंlजे, मराठा शेतकरी संघटनेचे संस्थापक सुभाष गागरे, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष तानाजी चौधरी, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गरड, मनीषा ताई राखूडे तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी हजर होते या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी आंदोलनाची एकच दिशा असावी आणि आत्तापर्यंत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी,जातीय सलोखा राखून आणि राजकीय हस्तक्षेप टाळून केंद्र आणि राज्य सरकार दोघांवर सोबतच दबाव आणण्यासाठी आंदोलनावर चर्चा करण्यात आली आणि या बैठकीला काही प्रतिनिधी येऊ शकले नाहीत म्हणून एकसूत्री भूमिका घेण्यासाठी ही एकच बैठक पुरेशी नसून परत या सिंहावलोकन बैठकीला व्यापक आणि सर्वसमावेशक स्वरूप देऊन सर्वांना सहभागी करून घेऊन संबंध महाराष्ट्रासाठी एकच दिशा एकच भाषा एकच धोरण आणि तेच तोरण आणि मराठ्यांचा असा हा एकसूत्री कार्यक्रम ठरवण्यासाठी सर्व समन्वयक सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना हजर राहण्याचे आवाहन सर्वांच्या वतीने  यांच्या वतीने आणि एकमताने करण्यात आले. 

या सिंहावलोकन बैठकीचे निमंत्रक हे मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती प्रमुख अविनाश खापे आणि आयोजक सकल मराठा समाज उस्मानाबाद संकेत सूर्यवंशी, विशाल लोमटे, वैभव मोरे, प्रीतम मुंडे, आकाश मुंडे, अक्षय नाईकवाडे, अमोल सिरसट, संकेत हरवले यांनी केले होते.

 
Top