सर्व “जागरण गोंधळ मंडळीची” आर्थिक परिस्थिती हालाखीची असून मार्च पासुन झालेल्या “लॉकडाऊन “ मुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे लग्नासंबंधित “जागरण गोंधळ “ विधी करण्याची परवानगी देण्याची मागणी गोंधळी समाज सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या पुर्वीच महाराष्ट्र शासनाने १०० लोकासह विवाहाच्या सर्व विधींना परवानगी दिलेली आहे व हिंदू विवाह परंपरेनुसार लग्नात “जागरण गोधंळ “ घालण्याची पुर्वापार परंपरा चालत आलेली आहे. संपूर्ण विवाहाला परवानगी असताना “जागरण गोधंळ” एवढ्याच विवाह विधीला परवानगी नाकारणे आम्हा गरीब गोंधळ्यासाठी खुपच अन्यायकारक आहे. त्यामुळे तुम्हीच सांगा आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न उपस्थित करून विवाहाच्या छोट्याशा विधीला परवानगी द्यावी , आम्ही “सोशल डिग्टंसिंग” पाळु, सॅनीटायझरचा वापर करू, तरी आपण उपरोक्त मागणीचा माणुसकीच्या दृष्टीने विचार करून “जागरण गोंधळ “ विधीस परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर गोंधळी समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सतिश लोंढे यांची स्वाक्षरी आहे.