लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर व कळंब- उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आ. कैलास घाडगे-पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या हस्ते उस्मानाबाद तालुक्यातील चिलवडी, सुर्डी, पिंपरी व गावसुद गावांमध्ये विविध विकासाचे लोकार्पण व उद्घाटन झाले.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली चिलवडी येथे स्थानिक खासदार विकास निधी अंतर्गत बोरवेल व पाण्याच्या टाकीचे लोकार्पण तसेच गाव अंतर्गत जनसुविधा व 2515 अंतर्गत राजेंद्र जाधव ते आकाश झुंजारे व बालाजी जाधव ते पंडित सुरवसे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे व सुर्डी येथे आ.कैलास घाडगे-पाटील यांच्या स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत संत धोंडिबुवा महाराज यांच्या मंदिराजवळ सभामंडपाचे व िपंपरी येथे स्थानिक आमदार निधी अंतर्गत हनुमान मंदिर समोर सभामंडप व गाव अंतर्गत जनसुविधा अंतर्गत योगेश गरड यांचे घर ते दत्ता गरड यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन तसेच गावसुद येथे आ.कैलास घाडगे-पाटील यांच्या स्थानिक आमदार निधी अंतर्गत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोर सभामंडप व गाव अंतर्गत जनसुविधा अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्या तसेच स्मशानभूमी च्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, शिवसेना तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी, माजी पं.स. सभापती श्याम जाधव, पं.स.सदस्य गजेंद्र जाधव, माजी पं.स सदस्य नानासाहेब पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष बुबासाहेब जाधव, वडगाव सि. चे सरपंच अंकुश मोरे, उपतालुका प्रमुख अण्णासाहेब पवार, विभागप्रमुख सौदागर जगताप, पंकज पाटील, उदय पाटील, शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले, प्रितम जाधव, सुर्डीचे सरपंच बाळासाहेब देशमुख, उपसरपंच महेश काटकर, चेअरमन सुरेश बागल, शाखा प्रमुख बालाजी फावडे, नरसिंग माने, पोलीस पाटील रामकृष्ण माळी, गावसुदचे उमेश बोचरे, जुनोनी माजी सरपंच अमोल मुळे तसेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.