तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आजपासून चौथ्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची ललित पंचमी निमित्त श्रीदेवीजींची नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली.
ललीता पंचमी निमित्त आज रथ अलंकार पूजा मांडण्यात येते. भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानी मातेस दिला. याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. यात, उद्या दि. 21 रोजी मुरली अलंकार महापूजा, दि. 22 रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि. 23 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 24 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. तत्पूर्वी, काल (सोमवार) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.
तत्पूर्वी रात्री तिसऱ्यामाळेच्या दिवशी मंदिरसंस्थानचेतहसीलदारश्रीसौदागरतांदळेवमंदिरसंस्थानचेसहायक व्यवस्थापकसिध्देश्वरइन्तुलेयांच्या उपस्थितीत अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात नंदीवाहनावरूनछबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्शाळ पूजा झाली.