उस्मानाबाद /  प्रतिनिधी-

तालुक्यातील कौंडगाव एमआयडीसीत येत असणाऱ्या नवीन कंपन्यामध्ये स्वंयचित मशिनचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक  बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळणार नाही. बेरोजगारीचा भेडसावणारा संभाव्य धोका ओळखून सदरील कंपन्यामध्ये मशिनीएवेजी जास्तीत-जास्त मुनष्यबळाचा वापर करून अनेक  सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

या संदर्भात सुशिक्षित बेरोजगार युवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, एमआयडीसी कौडगाव ता. जि उस्मानाबाद येथे नवीन कंपन्या येत आहेत. या कंपन्यामध्ये स्वंयचित मशिनचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक  बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळणार नाही. त्यामुळे या कंपनी मध्ये स्वयंचलित मशीन ऐवजी मनुष्यबळाचा जास्त वापर करण्यात यावा जेणेकरून बेरोजगार युवकांचा रोजगाराचा प्रश्न कांही अंशी सुटण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर सुशिक्षित बेरोजगार संघाचे मराठवाडा अध्यक्ष विशाल लोमटे तसेच उस्मानाबाद तालुक्याचे तालुकाध्यक्ष आकाश  चव्हाण, उपतालुकाध्यक्ष अमोल नवले, तालुका संघटक अमोल कोळगे, शहराध्यक्ष अक्षय मोहिते , तुळजापूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष आकाश क्षिरसागर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top