कळंब येथील एका युवकाने वेडसर मनोरुग्णास सुधारुन मानसात आणले वरुन सर्व स्तरातुन कौतुकास्पद थाप त्याच्या पाठीवर पडत असलेली दिसुन येत आहे
सोशल मिडियाच्या या काळात समाजामध्ये आपआपल्या परीने वेगवेगळया माध्यमातून समाजातील गरजू आणि वंचित घटकांची सेवा करणारे अनेक जण आपल्याला पहायला मिळतात. काही जण प्रामाणिकपणे मनोभावे सेवा करूनही प्रसिद्धीची कधीही हौस बाळगत नाहीत. तर काही जण सेवेच्या निमित्ताने प्रसिद्धी मिळावी म्हणून धडपडतात.
अशीच एक प्रसिद्धीच्या मागे न धावणारी निस्वार्थी सेवा कळंबमध्ये पहावयास मिळाली. येथील ढोकी रोड लगत मुथुट फायनान्स समोर गेल्या १५-२० दिवसांपासुन एक मनोरुग येत असे, त्याला भूक लागल्यावर ती कशी भागवावी हे देखीत समजत नव्हते. पोटाची भूक तो रस्त्यावरील जनावरांना पाणी पिण्यासाठी ठेवलेल्या हौदातील पाणी ओंजळीने पिउन तो भागवताना कळंब येथील छ. शिवाजी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या ‘ जिव्हाळा परिवारातील ‘सदस्य दगडू झोंबाडे यांनी पाहिले ते सद्या मुथुट फायनान्सचे कर्मचारी आहेत. यावर दगडू यांनी त्याची भूक भागवण्यासाठी दररोज स्वतःच्या डब्ब्या सोबत त्यासाठी घरीऊन जेवण आणण्यास सुरवात केली. कधी कधी इतर सोबत्यांच्या उरलेला डब्बा घेऊन त्या मनोरुग्णाला देऊ लागले त्यामुळे त्या मनोरुग्णाला त्यांचा लळा लागला. मग अगदी सुट्टी असली तरी तो तासनतास दगडूची वाट पाहत उभा राही. तेव्हा दगडू हे करंजकल्ला या त्यांच्या गावाकडे असले तरी काही जण त्यांना फोन करून सांगत तेव्हा दगडू त्या मनोरुणाला गाडीवरून खास डब्बा आणून देत.
त्या मनोरूग्णाचे डोळ्याचे दाडीचे केस प्रचंड वाढलेले होते, कपडे ऑईल मध्ये बुडवल्याप्रमाणे काळेकुट्ट, तर अंघोळ त्याला पावसानेच घातलेली. अश्या या दगडासारख्या माणसाला जिव्हाळ्याच्या दगडूने सौंदर्य देण्याचे ठरवले त्याने त्या मनोरुग्णाला स्वतःच्या गाडीवर बसऊन ओळखीच्या नाव्हयाकडे घेऊन गेले, आगाऊ रक्कम देऊन ही तिन चार नाव्ह्यांनी त्या मनोरुग्णास हात लावण्यास नकार दिला तेव्हा खडकी येथे म्हैस भादरण्यासाठी गेलेल्या कळंब येथील श्रीमंत मंडाळे यांनी एकही रुपयान घेता त्याची दाडी कटींग केली. हे करताना तो मनोरुग्ण अंग झाडत होता तेव्हा दगडू आणि त्यांचे मित्र पिंटू एखंडे यांची दमछाक झाली. शेवटी दाडी, कटींग झाल्यावर दोघांनी त्याला दिवाळीची अंघोळ घातली, नवीन कपडे चढवले पोटभर जेऊ घातले आणि दगडाला दिलेल्या या सौंदर्या सोबत दगडू आणि पिंटू ने एक सेल्फी घेतला.