उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्हयात श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दि.09 ऑक्टोंबर 2020 ते दि.01 नोव्हेंबर-2020 या कालावधीत साजरा होणार आहे.तसेच येरमाळा येथेही श्री येडेश्वरी देवी मंदीर येथे नवरात्र महोत्सव साजरा होत आहे.

  कोविड-19 आजाराचे पार्श्वभूमीवर व नवरात्र महोत्सव बंदोबस्ताचे अनुषंगाने तुळजापूर शहरामध्ये येणारे बाहेरील नागरिक व वाहनांना दि.15 ऑक्टोंबर 2020 रोजीचे 00.01 वा. पासून दि.31 ऑक्टोंबर 2020 रोजीचे 12.00 वा.पावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे तुळजापुर शहरात येण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे.

  तसेच उस्मानाबाद जिल्हयामध्ये महाराष्ट्र राज्याचे बाहेरील जिल्हयातुन व इतर राज्यातून तुळजापूर येथे व श्री येडेश्वरी देवी यात्रा,येरमाळा येथे तसेच अन्य यात्रांकरिता येणाऱ्या नागरिकांना व वाहनांना वाहनांना दि.15 ऑक्टोंबर 2020 रोजीचे 00.01 वा. पासून दि.31 ऑक्टोंबर 2020 रोजीचे 12.00 वा.पावेतो बंदी घालण्यात आलेली आहे.ही बाब राज्यातील तसेच परराज्यातील भाविकांना जर समजली नाही व त्यांनी तुळजापूर व परिसरात येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना परत पाठविताना अडचणी येवू शकतात. तसेच त्यांना तुळजापूर शहरामध्ये बंदी असल्याचे समजावून सांगताना गोंधळाची स्थिती निर्माण होवू शकते.असे अपर पोलीस अधीक्षक,उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

 
Top