कळंब / प्रतिनिधी  -

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने फेब्रुवारी2020 मध्ये घेतलेल्या इयत्ता 5वी च्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद हसेगाव केज शाळेतील 13 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत.

 ्यात शिवानी पाटील 218 गुण घेऊन प्रथम तर सायली सोनटक्के 184 गुण घेऊन द्वितीय व पार्थ साबळे 172 गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच इतर पात्र विद्यार्थी शिवप्रसाद सोनटक्के, श्रीवर्धन पांचाळ, प्रिया चवरे, ओंकार परकाळे, तनुजा शिंदे, साक्षी यादव, सृष्टी साळवे, कुणाल परकाळे, आदित्य पांचाळ, आशिष खरडकर यांचा यशस्वी विद्यार्थ्यांत समावेश आहे.

 या सर्व यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना श्री अमोल बाभळे, श्रीमती लक्ष्मी कोकाटे,श्री राजाभाऊ गुंजाळ, श्री प्रशांत घुटे, श्रीमती प्रतिभा बिडवे व समाधान भातलवंडे यांनी मार्गदर्शन केले.

 या यशाबद्दल सरपंच श्री विश्वभर पाटील मुख्याध्यापक श्री देवीचंद ताठे,गटशिक्षणाधिकारी श्री परमेश्वर भारती, शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुशील फुलारी, केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव,तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ प्रशांत पांचाळ व सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

 
Top