उस्मानाबाद / प्रतिनिधी -

 मुसळधार पाऊस अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि शेतजमिनीचे प्रचंड - अतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी गावात घरात पाणी शिरले आहे. परंडा तालुक्यातील देवगाव येथे नरसाळे वस्तीस दोन नद्यांच्या संगमाच्या पाण्याने वेढा घातला असून त्यांच्या पर्यंत पोहचणेही कठीण आहे. चांदणी व खासापूरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरूच आहे. वस्तीवर सुमारे ९५ लोक अडकलेले असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच अन्य संबंधित अधिकारी यांच्याशी बोलणे झाले आहे. प्रशासन एअर फोर्सचे हेलिकॉप्टर आणि अधिकच्या इलेक्ट्रॉनिक बोटी उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात आहे. असे सांगुन येथील परिस्थिची भाजपा आ.सुजितसिंह ठाकूर यांनी पहाणी केली

 
Top