तुळजापूर शहर व तालुक्यात सलग पंधरा तासात १८० मिमि इतका विक्रमी पाऊस झाला यापुर्वी तालुक्यात शंभर मिमि पाऊस नोंदीचा विक्रम होता. तो विक्रम बुधवारच्या पावसाने मोडला . यामुळे झालेल्या नुकसानीचा भाजपाचे अामदार राणाजगजितसिंह पाटील यंानी आढावा घेतला.
या झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतातील उभे पिक , शेती जनावरे, घरे , रस्ते याचे अतोनात नुकसान झाले आहे तर अनेक शेतकऱ्यांची जनावरे, बैल बारदाना, कोटे, सोयाबीन काडचे ढीग यात वाहून यात तुळजापूर तालुक्यातील तीन मंदीरे श्रीतुळजाभवानी, मातंगीदेवी येमाई या तीन मंदीरांन मध्ये पाणी घुसले होते.
1072 च्या दुष्काळात घाटशिळ घाटा खाली बांधलेला जुनी माती पाझर तलाव फुटला लातूर रस्त्यावर असणाऱ्या पाचुंदा येथील महावितरणचा सबस्टेशन मध्ये पाणी घुसुन विज वितरण व्यवस्था विस्कळीत झाली याचा परिणाम शहराला बुधवारी पीणीपुरवठा होवू शकला नाही, यात मंगळवार राञी 40 मिमि तर बुधवारी दुपार पर्यत 140 असा 180 मिमि पाऊस पंधरा तासात पडला. या अतिवृष्टी त शेकडो एकर वरील सोयाबीन कांदा तूर ऊस वाहुन जावून शेकडो कोटीचे नुकसान झाले