उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

वीज वितरण कंपनीने मागणीच केली नसताना वीज नियामक आयोगाच्या निवाड्यातील त्रुटीमुळे नव्या भूमिगत वीज जोडणी च्या दरात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे, मात्र नियामक आयोगाच्या निवाड्यातील चूक दुरुस्त करून घेण्याऐवजी वितरण कंपनीने त्याचा लाभ घेत नव्या जोडणीसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना लुटण्याचे काम सुरू केले असल्याची टीका जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.

 विज नियमक आयोगाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा तसेच वितरण कंपनीने ही ग्राहकाकडून घेतलेले अतिरिक्त पैसे परत करावेत. नव्या ग्राहकाला भूमिगत वीज जोडणी देण्यासाठी पाच किलोवॅट पर्यंतच्या जोडणीसाठी तीन हजार रुपये, पाच किलो वॅट ते दहा किलो वॅट पर्यंतच्या जोडणीसाठी सात हजार रुपये शुल्क घेण्याची परवानगी नियामक आयोगाने वीज वितरण कंपनीला दिली होती. आयोगाच्या 12 सप्टेंबर 2018 रोजी च्या आदेशाने ही रक्कम अनुक्रमे 3 हजार शंभर रुपये व 7150 रुपये करण्यात आली. त्यानंतर या वर्षी पुन्हा वितरण कंपनीने नियामक आयोगाकडे शुल्क वाढवून देण्यासाठी अर्ज केला होता .पाच किलोवॅट पर्यंत जोडणीसाठी 3630 रुपये तर पाच ते साडेसात किलो पर्यंत जोडण्यासाठी आठ हजार रुपये द्यावेत अशी मागणी वितरण कंपनीने केली होती. मात्र नियामक आयोगाने मागणी नसताना ही स्लॅब बदलत पाच किलो वॅट च्या ऐवजी 0.5 किलो वॅट पर्यंतच्या वापराच्या जोडणीसाठी 3400 रुपये व 0.5 ते 7.5 किलो वॅट पर्यंतच्या जोडणीसाठी सात हजार सहाशे रुपये शुल्क मंजूर केले आहे. एक प्रकारे वितरण कंपनीने पाच किलो वॅट पर्यंतच्या जोडणी साठी पाचशे तीस रुपये वाढवून मागितले असताना आयोगाच्या चुकीमुळे आठ ते नऊ पट वाढ मंजूर झाली आहे. कारण पाच किलो वॅटपर्यंत ग्राहकांचा पहिला टप्पा असताना आयोगाच्या आदेशाला 0.5 किलो वॅट असा उल्लेख झाला आहे. त्यामुळे 0.5 ते पाच किलो वॅट पर्यंतच्या वापरासाठी जोडणी घेणारे ग्राहक वरच्या टप्प्यात ढकलले जाऊन त्यांना नव्या जोडणीसाठी सात हजार सहाशे रुपये मोजावे लागत आहेत .वास्तवात नियामक आयोगाच्या निकालातील गफलत लक्षात आल्यावर वितरण कंपनीने आधीच दुरुस्तीसाठी याचिका दाखल करून ही बाब आयोगाच्या निदर्शनास आणायला हवी होती .प्रत्यक्षात याबाबतचे आदेश येताच वीज वितरण कंपनीच्या व्यवस्थापनाने 7 एप्रिल 2020 रोजी परिपत्रक जारी करून 0.5 किलो वॅट पर्यंतच्या वीजपुरवठ्याच्या जोडणीसाठी 3400 रुपये तर 0.

5ते सात पाच किलोमीटरपर्यंत वापराच्या जोडणीसाठी सात हजार सहाशे रुपये घेण्यात यावेत असे आपल्या कार्यालयांना करून टाकले आहे .त्यामुळे तेव्हापासून साडेसात किलो वॅट पर्यंतच्या भूमिगत वीज जोडणीसाठी नव्या ग्राहकाकडून सात हजार सहाशे रुपये वसूल केले जात आहेत .म्हणजे नव्या ग्राहकाकडून वीज वितरण कंपनी प्रत्येकी 4 हजार दोनशे रुपये अतिरिक्त वसूल करीत आहे. भूमिगत वीज जोडणीसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांची यातून एकीकडे लूट होत असताना वितरण कंपनीला मात्र करोडो रूपयांचा अतिरिक्त लाभ होत आहे .त्यामुळे वीज नियामक आयोगाच्या मार्च महिन्यातील आदेशात दुरुस्ती करण्यासाठी आता जनता दल तर्फे वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या ग्राहकाकडून जादा दराने शुल्क वसूल करण्यात आले आहे त्यांचे पैसे वितरण कंपनीने परत करावेत अशी मागणीही ॲड भोसले केली आहे.

 
Top