तुळजापूर / प्रतिनिधी-  

आई जगदंबे राज्याला लवकर कोरोना मुक्त कर असे साकडे राज्याचे पालकमंञी शंकरराव गडाख यांनी  श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीयनवराञोत्सवातील पहिल्या माळेदिवशी शनिवार दि.१७रोजी सांयकाळी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवून कोविड 19 पार्श्वभूमीवर शासन निर्णयाच्या आदेशाचे  पालन करीत  उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंञी  शंकरराव यशवंतराव गडाख यांनी राजमाता जिजाऊ महाद्वार मधुन दर्शन घेऊन घेवुन शारदीय नवराञोत्सवातील ओटीभरुण देविची आरती करुन कुलधर्म कुलाचार केला.

श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानध्यक्ष तथा जिल्हाधिकारी  यांनी पालकमंञी यांना नवराञोत्सव तयारी बाबतीत सविस्तर माहीती दिली. यावेळी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे हे सोमवार किंवा मंगळवारी तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे अतिवृष्टी ने झालेल्या नुकसान बाबतीत पाहणी करण्यासाठी आणण्याचे प्रयत्न असल्याचे पालकमंञी शंकरराव गडाख यांनी सांगितले. यावेळी खा.ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद निंबाळकर,  अँड धीरज पाटील, सुधीर कदम, शाम पवार, सुनिल जाधव, प्रतिक रोचकरी, सागर इंगळे, संजय भोसले, बाळासाहेब शिंदे, बापु नाईकवाडी आदी उपस्थितीत होते.


 
Top