उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उपळा (मा) ता.  उस्मानाबाद येथील अॅड. पांडुरंग उपाख्य ( बापूसाहेब )दिगंबरराव कुलकर्णी यांचे मुंबई येथे वृद्धापकाळाने  (91) सोमवार दिनांक 14 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी निधन झाले. त्यांनी   उस्मानाबाद- लातूर जिल्हा वेगळा झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले जिल्हा संघचालक म्हणून त्यांनी काम केले तसेच उस्मानाबाद जिल्हा होमगार्ड समादेशक म्हणूनही त्यांनी काम केले होते त्यांचा स्वभाव अतिशय चांगला मनमिळावू व माणसं जोडणारा होता. त्यांच्या पश्चात त्यांचा एक मुलगा, दोन मुली,  सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी मुंबई येथे करण्यात आला.

 
Top