उस्मानाबाद / प्रतिनिधी
उस्मानाबाद शनिवार संगीत मंडळ उस्मानाबाद यांच्यावतीने ज्येष्ठ संवादिनीवादक स्व पंडित आप्पासाहेब जळगावकर यांच्या ११व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कोरोना विषाणूच्या संसगर्गा मुळे प्रतिवर्षी होणारा संगीत समारोह यावर्षी आयोजित करता आला नाही पं आप्पासाहेब जळगावकर हे शनिवार संगीत मंडळाचे संगीत क्षेत्रातील आधारस्तंभ होते त्यांच्या सहकार्याने देशातील अनेक नामवंत कलाकारांच्या कलेचा अस्वाद घेण्याचा लाभ उस्मानाबाद जिल्ह्यातील रसिकांना मिळाला.
याप्रसंगी शनिवार संगीत मंडळ सर्व सदस्य उपस्थित होते. डॉ. मो.भा. कुलकर्णी , पी. डी देशपांडे, विलास धर्म यांच्या हस्ते पं.आप्पासाहेब जळगावकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.अरुण जोशी, भागवत कुंभार , आनंद समुद्र कालिदास म्हेत्रे यांनी आप्पांच्या जुन्या आठवणी सांगून स्मृतीस उजाळा दिला .प्रदीप पळसकर, डॉ.श्रीकांत कवठेकर, सिद्धेश्वर जोशी, अथर्व जोशी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले