उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाकडून प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून अवैधपणे हमीपत्र घेण्यात येत होते. वास्तविक दि. 30/07/2020 रोजीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या परिपत्रकानुसार सर्व संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना कळविण्यात आले आहे की, यापूर्वी महाराष्ट्र शासनाने दि. 08 मे 2020 रोजी मार्गदर्शक सुचनामध्ये सर्व विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेश देण्यासंदर्भात सुचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पूर्वीच्या सत्रात अनुत्तीर्ण किंवा ए.टी.के.टी. असेल तरीसुध्दा त्या विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेश देण्यात यावा अशा स्पष्ट सुचना विद्यापिठांकडून देण्यात येवून देखील डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाकडून प्रवेश ऱद्द झाल्यास त्याच मी”च जबाबदार राहीन अशा प्रकारचे अवैधपणे हमीपत्र घेत होते.त्यामुळे युवा सेनेने विद्यार्थ्यांचा हा प्रश्न मनावर घेऊन संबंधित प्राचार्या यांच्याशी चर्चा करून हमीपत्राचा प्रश्र निकाली काढाला.
विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या सदर हमीपत्रामध्ये महाविद्यालयाकडून लिहून घेण्यात आलेले आहे की, नजीकच्या काळात विद्यापिठा कडून माझा प्रवेश रद्द झाला तर त्यासाठी मी वैयक्तिकरित्या जबाबदार असेल व माझा प्रवेश रद्द झाल्यास प्रवेश शुल्क माझ्याकडून वापस घेण्यात येणार नाही. या संदर्भात विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या नंतर युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अॅड. संजय भोरे यांच्या नेतृत्वात युवा सेनेचे तालुका सहसंघटक व्यंकटेश कोळी, सचिन माने, योगेश गवाड, प्रशांत जगताप, अंकुश वारे, विकी मसने, अविनाश लोमटे, सुजित लोमटे आदिसह युवासेनेच्या शिष्टमंडळाने डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची त्यांच्या दालनामध्ये भेट घेतली. यावेळी युवासेनेचे जिल्हा समन्वयक अॅड. संजय भोरे यांनी प्राचार्यांना धारेवर धरत विद्यार्थ्यांकडून अवैधपणे भरुन घेतलेले सर्व हमीपत्र श्री भोरे यांनी महाविद्यालया कडून काढून घेतले. व यापुढे कुठल्याही विद्यार्थ्यांकडून हमीपत्र भरुन न घेण्या संदर्भात युवासेनेच्या वतीने प्राचार्यांना सुचना केल्या. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क जबरदस्तीने आकारण्यात आलेले आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना ते परत करण्यास सांगितले.
यावेळी प्राचार्यांनी चूक मान्य करत यापुढे त्याची पुर्नरावृत्ती होणार नाही अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मागील सत्राच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण दाखविण्याची विनंती वारंवार करुनही महाविद्यालयाकडून गुण दाखविण्यात येत नसल्याबाबत देखील युवासेनेकडे गाऱ्हाणे मांडले होते. याबाबत युवासेनेने विद्यार्थ्यांना सदर परीक्षेचे गुण दाखविण्यात यावे असे सांगितले असता प्राचार्यांनी ज्यांना प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण बघावयाचे असतील त्यांना ते दाखविण्यात येतील असे सांगितले.