उस्मानाबाद / प्रतिनिधी-
श्री ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त ग्रंथ श्रेष्ट श्री ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रतिमेचे पूजन प्रा. श्यामराव दहिटणकर, हभप राजकुमार संपकाळ, रामेश्वर धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्रा. दहिटणकर म्हणाले की, श्री ज्ञानेश्वरी हा गीतेवरील भाष्य ग्रंथ आहे. हा गुरू शिष्य संवाद आहे. हा ग्रंथ अशुद्ध झाल्याने त्याच्या शुद्धीकरणाची गरज ज्ञानेश्वर माऊलीने भासली म्हणून त्यांचे शुद्धीकरण करण्याचे कार्य माउलींनी संत श्री एकनाथ महाराजांकडून करवून घेतले. त्यांनी देखील तो ग्रंथ निष्ठेने शुध्द केला. तो दिवस म्हणजे भाद्रपद वद्य षष्टीचा आहे. हा वारकऱ्यांच्या व भक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र दिवस आहे. आजच्या दिवशी कृतज्ञतेने या घटनेची स्मृती जागवणे व समाजात प्रबोधन करणे गरजेचे आहे. यामुळे सात्त्विकता वृध्दिंगत होऊन मनात शांती लाभते. हभप संपकाळ गुरुजींनी या विषयी उद्बोधक व मार्गदर्शन केले. कार्यक्रमास रामेश्वर धुमाळ, सुनीता दहिटणकर, सार्थकी वाघ, निकिता इंदापूरकर, सत्यहरी वाघ, अर्णव दहिटणकर, कृष्णा इंदापूरकर आदी उपस्थित होते. दरम्यान संत श्री स्वरूपानंद संपादित श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठाचे सामुदायिक वाचन केले.