परंडा / प्रतिनिधी : -
 देशात व राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.रक्ताची गरज देखील मोठ्या प्रमाणात लागत आहे त्या पार्श्वभूमीवर  ‘’विश्व जन आरोग्य सेवा समिती’’ व ग्रामस्थ कुक्कडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान शिबीर घेण्यात आले.छत्रपती  प्रतिमा पूजन परंडा तालुका बालविकास अधिकारी नारायण गायके व गावचे प्रतिष्ठित नागरिक एकनाथ वायसे  यांच्या हस्ते करून शिबिरास प्रारंभ झाला.या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले, विशेष बाब म्हणजे नारायण गायके  यांनी सर्व प्रथम रक्तदान करून सहभाग नोंदवला.
   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते.त्याला प्रतिसाद देत,’’विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या’’  संस्थापक अध्यक्षा श्रीमती.छायाताई भगत यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातअनेक  ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात,गर्दी टाळत रक्तदान शिबीर घेण्यात आले.भगवंत रक्तपेढी बार्शी यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदात्यांचे अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्त घेतले गेले आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगबाबतही विशेष काळजी घेण्यात आली होती. दोन रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते.महिलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता. शिवाय, स्वच्छतेची विशेष खबरदारी म्हणून वारंवार सिनेटाईझरचा वापर करण्यात येत होता.सोशल डिस्टंनचे पालन व आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे सोमनाथ कोकाटे यांनी बोलताना सांगितले.
 राज्यात दररोज साधारण पाच ते सात हजार रूग्णांना विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरज असते. कोरोनामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे. शिवाय, उन्हाळी सुट्टीतील अनेक मोठे रक्तदान शिबिर कोरोनामुळे आयोजितच केले गेले नाहीत. त्यामुळे राज्यात अवघ्या काही दिवसांचाच रक्त साठा शिल्लक असल्याची माहिती स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. शिवाय, छोट्या स्तरावर रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे आवाहनही केले होते.
ग्रामीण भागात लहान लहान रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली जावी.यामुळे गरजू रुग्णांची रक्ताच्या बाबतींत होणारी गैर सोय टळेल असे भगवंत रक्तपेढिचे  गणेश जगदाळे यावेळी म्हणाले.   यावेळी सोमनाथ कोकाटे जिल्हा समन्वयक विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य शाखा उस्मानाबाद तथा जिल्हाध्यक्ष विश्व जन मराठा संघ उस्मानाबाद,विश्व जन आरोग्य सेवा समितीचे परंडा तालुका आरोग्यदूत तथा तरुण गर्जना विभागीय संपादक राहुल शिंदे, पंढरी मेडिकल बारामतीचे  अमोल वायसे,तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी पाटुळे, पोलीस पाटील विनोद निरवने आदी उपस्थितीत होते.प्रत्येक रक्तदात्यास विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या वतीने कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
 
Top