उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील देवधानोरा पारधी वस्ती येथे तीन दिवसांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे.
पारधीवस्तीतील शिवाजी पवार व त्यांचा मुलगा- संतोष या दोघांचा नातेवाईकांनी खुन करुन दुसरा मुलगा- दिनकर यासह शिवाजी पवार यांचा पुतण्या-तुकाराम यांना गंभीर जखमी केले होते. यावरुन शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा प्रकार रविवारी (दि. ६) दोनला घडला होता. गुन्हा तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिष खांडेकर यांसह सहाय्यक पोलिस फौजदार मधुकर घायाळ, हवालदार तानाजी माळी, भागवत झोंबाडे, धनंजय कवडे, पोलिस नाईक समाधान वाघमारे, महेश घुगे यांच्या पथकाने गोपनीय खबरेच्या आधारे बुधवारी कळंब परिसरातून गुन्ह्यातील आरोपी दशरथ शिवाजी शिंदे उर्फ आप्पा, बाळू शहाजी शिंदे उर्फ पप्पू (दोघे रा. मांडवा), राहुल गणेश पवार (रा. देवधानोरा, ता. कळंब) यांना ताब्यात घेउन गुन्ह्या प्रसंगी वापरलेली डिस्कव्हर मोटारसायकलही जप्त केली. उर्वरीत तपासकामी संबंधित तीघांना शिराढोण पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे.

 
Top