उमरगा / प्रतिनिधी
शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील वाणिज्य विभागामार्फत उमरगा- लोहारा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच सी ए फाउंडेशन कोर्ससाठी स्वतंत्र बॅच सुरू करण्यात येत असून सोमवारी (०७) ऑनलाइन झूम मीटिंगवर सी ए फाउंडेशन कोर्सची कार्यशाळा संपन्न झाली.
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्यावतीने सुरुवात करण्यात येणाऱ्या सी ए फाउंडेशन कोर्सबाबत सोमवारी कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी चार्टर्ड अकाउंटंट आप्पासाहेब सावंत, चार्टर्ड अकाउंटंट श्रीकांत भुतडा, प्रदीप किट्टेकर यांनी सीए फाउंडेशन कोर्स कसा असतो आणि सीए झाल्यावर करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले सीए सावंत यांनी मी सीए कसा झालो याबाबत प्रोत्साहनपर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. उपप्राचार्य व समन्वयक डॉ संजय अस्वले यांनी सीए फाउंडेश न कोर्स साठी अकरावी, बारावी विद्यार्थ्यांना स्वतंत्र बॅच आणि पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅच तसेच सी ए फायनल अंतिम परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र बॅच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. या कोर्ससाठी अकरावी, बारावी आर्ट, सायन्स, कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांनी व बीए, बीएस्सी, बीकॉम, बीसीएस पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आव्हान प्राचार्य डॉ जी एच जाधव यांनी केले आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी महाविद्यालयाच्या चौकशी विभागात करावी कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. उपप्राचार्य प्रा. डि व्ही थोरे, समन्वयक डॉ डी बी ढोबळे यांची उपस्थिती होती. डॉ अजित आष्टे यांनी आभार मानले.
 
Top