उमरगा / प्रतिनिधी
मागील दोन दिवसात जिल्ह्यात व उमरगा-लोहारा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चार मंडळ विभागात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी महसूल अन कृषीमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,मागील दोन दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यासह उमरगा-लोहारा तालुक्याती ल मुरूम, दाळिंब, लोहारा, माकणी मंडळ विभागात रविवारी व सोमवारी रात्री झालेल्या वादळी वारा व पावसामुळे काढणीला आलेल्या व काढून ठेवलेल्या मूग, उडीद पिकासोबतच ऊसाचे फड आडवा पडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने तात्काळ प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी पत्रात करत नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यात यावी अशी विनंती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी कृषीमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेवुन केली आहे. यावेळी आमदार कैलास पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते.