कळंब ( शिवप्रसाद बियाणी )
येथील बाबा नगर भागातील राष्ट्रमाता जिजाऊ चौकातुन येणारा मुख्य रस्ता, वारे हाॅस्पीटल शेजारील नालीवरील पुल, कचरा व्यवस्थापन आशा अनेक प्रलंबीत समस्यांबाबत या भागातील युवकांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देवून आंदोलने करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
  पुढे आपल्या निवेदनात असे नमुद केले कि कळंब शहरातील बाबा नगर भागात सत्ताधारी मंडळी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या भागातील नाल्या ची साफ सफाई केली जात नाही, या भागातील अनेक नाली वरील पुलांना मोठे खड्डे पडले असून, यामुळे अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे. या भागात रस्त्यावरच पाणी साचत असल्याने रोगराई निर्माण होण्याची शक्यता आहे. या. भागात रस्त्यावर खड्डे असल्याने खड्यात रस्ते अशी  परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी मुख्याधिकारी यांनी या भागाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर समस्या चे निवारण करावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल आसा ईशारा देण्यात आला आहे.
     निवेदनावर लक्ष्मीकांत गिरी, बबलु गोरे, सुभाष शिंदे, गजानन शिंपले, शंकर टिंगरे उमाकांत गिरी,विशाल बाकले,दीपक मंडळे,संतोष कांबळे,बाळासाहेब पांचाळ,संदीप गायकवाड,सोमनाथ माने,गणेश खामस्वडीकर, विवेक सलके,शुभम कान गुदे, कृष्णा पवार,रवींद्र राऊत, संकेत कणसे, अमोल पवरे, सुशांत लोमटे, श्रीकांत तवले, सुनील गोरे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत..

 
Top