उस्मानाबाद / प्रतिनिधी-
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  उपपरिसर उस्मानाबाद येथील प्रवेशद्वाराला विद्यापीठ कमान व उपकेंद्र परिसरात प्रवेशद्वाराच्या समोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णकृती पुतळा उभारणे तसेच कोरोना महामारिमुळे विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या  सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक  फीस सरसकट माफ करावी, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन उस्मानाबाद च्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मा.कुलगुरु   देऊन करण्यात आली आहे .
 यावेळी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अलंकार बनसोडे, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन दिलपाक, जिल्हा संघटक विकास गंगावणे, भीम निर्णायक युवा संघटना जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, तालुका अध्यक्ष अजिंक्य गायकवाड , तालुका उपाध्यक्ष यशवंत सपकाळ , शहराध्यक्ष अक्षय बनसोडे, सदस्य सुदर्शन हूंडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top