उस्मानाबाद / प्रतिनिधी
 आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत अनुसुचित जमातीच्या शासकीय आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी वैयक्तिक वापराच्या वस्तु व लेखन साहीत्य, पुस्तके इ.बाबीसाठी तसेच जिल्हा, विभाग व महानगरपालिका स्तरावरील वसतिगृहामधील विद्यार्थ्याना भोजनासाठी देण्यात येणाऱ्या DBT धोरणाचा अभ्यास करुन पुर्वीप्रमाणे सदर साहीत्य वस्तु स्वरुपात द्यावे/आहारासाठी भोजनठेके सुरु करावेत. किंवा DBT धोरणच सुरु ठेवावे, याचा अभ्यास करण्यासाठी आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय दि. 13 ऑगस्ट 2020 अन्वये अभ्यासगट स्थापन करण्यात आलेला आहे.
 तसेच सदर थेट लाभ हस्तांतरण (DBT) धोरणाचा अभ्यास करण्यासाठी शासनाने अभ्यासगटाची स्थापना केलेली असुन अभ्यासगटाचे सदस्य शासकीय आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी,पालक व सेवाभावी संस्थाचे सदस्य यांचेशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत.
  संपर्कासाठी प्रकल्प कार्यालयाचा पत्ता:- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर प्लॉट नं-२ डॉ बाबासाहेब आंबेडकर सोसायटी आर्कीटेक्ट कॉलेजजवळ, कुमठा नाका परिसर, सोलापूर दुरध्वनी क्र. ०२१७-२६०७६००

 
Top