उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम, 2020” प्रसिद्ध केले असून यातील नियम क्र. 3 नुसार करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यामधील कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्व CCC, DCH व DCHC च्या ठिकाणी रुग्णांना देण्यात येणा-या ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत रहावा. यासाठी जिल्हा उदयोग केंद्राचे महाव्यवस्थापक भी.हानबर(9604530230) यांची समन्वय अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी नियुक्ती केली आहे.
समन्वय अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कामकाज करावे.
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद व जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. उस्मानाबाद यांचेशी समन्वय ठेवून जिल्ह्यातील सर्व CCC, DCH, DCHC या ठिकाणी रुग्णांना देण्यात येणा-या ऑक्सीजनची मागणी, उपलब्धता, आवश्यकतेनुसार पुरवठा इ. चे अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करणे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व CCC, DCH, DCHC याठिकाणी रुग्णांना देण्यात येणा-या ऑक्सीजनच्या पुरवठादारांचे जिल्ह्यातील कारखान्यांना भेटी देणे व त्यांचेशी समन्वय ठेवून मागणी व आवश्यकतेनुसार ऑक्सीजन पुरवठा नियमित व सुरळीत सुरु राहील याची दक्षता घेणे.
जिल्ह्यातील सर्व CCC, DCH, DCHC या ठिकाणी ऑक्सीजन पुरवठा कमी पडू नये. यासाठी आवश्यतेनुसार जिल्हयातील व इतर जिल्हयांतील ऑक्सीजन पुरवठादारांशी संपर्क साधून आवश्यतेनुसार मागणी नोंदविणे व मागणीनुसार विहित वेळेत ऑक्सीजनचा पुरवठा होईल. याअनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करणे 4.वरीलप्रमाणे कार्यवाही करुन नियमितपणे जिल्हाधिकारी,उस्मानाबाद यांचेकडे दैनंदिन अहवाल सादर करणे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे, असे ही आदेशात नमुद केले आहे.