तुळजापूर / प्रतिनिधी
 महाराष्ट्र राज्य नगरपालिका, महानगरपालिका शिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी तुळजापूर खुर्द येथील नगरपालिका शाळेतील शिक्षक अशोक शेंडगे यांची निवड केली.
संघटनेचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी निवड जाहीर केली तर संघटनेचे राज्य सरचिटणीस अरुण पवार यांनी शेंडगे यांना निवडीचे पत्र दिले. शेंडगे यांनी तुळजापूर खुर्द येथील नगर पालिका शाळेचा सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्तेत औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांक अबाधित ठेवला आहे. तसेच २०१५ मध्ये मराठवाड्यातील पहिली आयएसओ नगर पालिका शाळा करण्याचा बहुमान त्यांनी शाळेस मिळवून दिला आहे. शेंडगे यांच्या निवडीबद्दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष शामराव कोळी, जयंत इंदापूरकर, राजेंद्र धावारे, सुरेश गायकवाड, उमाकांत देशमुख, संतोष खंगले आदींनी कौतुक केले आहे.

 
Top